वाघोली – येथे सातव्या दिवशी अनेक गणेश उत्सव मंडळांनी लाडक्या बाप्पाला ढोल ताशाच्या गजरात स्वागत करून निरोप दिला.
शिरूर लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी अनेक गणेश मंडळांना भेटी देत गणरायाच्या मनोभावे आरत्या केल्या. शिरूर लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी वाघोली येथील माजी उपसरपंच शांताराम कटके यांच्या अखिल शिवतेज तरुण मंडळाने आयोजित केलेल्या गणेशोत्सवात मिरवणुकीत सहभाग घेतला. उपस्थित तरुणाई व महिला भगिनींचा जोश पाहून खासदार कोल्हे यांना देखील ढोल वाजवायचा मोह आवरला नाही. यावेळी खासदार कोल्हे यांनी ए विघ्नहर्ता, वाघोलीकरांच्या सर्व ईच्छा आकांक्षा पूर्ण होवोत, हीच तुझ्या चरणी प्रार्थना केली.