वाघोली – वाघोली (तालुका हवेली) येथील प्रतिष्ठित आणि प्रशस्त सोसायटी म्हणून परिचित असणाऱ्या कमल बाग गृहरचना मर्यादित सोसायटीच्या चेअरमन पदी उद्योजक संतोष ज्ञानोबा देशमुख यांची बिनविरोध निवड झाली आहे. सोसायटीच्या सेक्रेटरी पदी मनोज केशवराव मुळजकर तर आशिषकुमार घनश्यामप्रसाद राय यांची खजिनदारपदी बिनविरोध निवड झाली आहे.
सोसायटीच्या संचालक पदी रामदास दत्तात्रेय दाभाडे, युवराज सुदाम दळवी, संतोष ज्ञानोबा देशमुख, ज्ञानदेव तुकाराम गावडे, प्रशांत लक्ष्मण काळे, सचिन भास्कर काळे, मनोज केशवराव मुळजकर, आशिषकुमार घनश्यामप्रसाद राय, संदीप तुकाराम शिंदे, विठ्ठल पुंजाजी वडीतके, वंदना सुनील कुंजीर, प्रांजल दत्तात्रय पाटील, विजय ज्ञानोबा दळवी, प्रदीप कुमार साहा, रोहिदास धुराजी राठोड यांची संचालक पदी यापूर्वी बिनविरोध निवड झाली होती.
निवडीबद्दल सोसायटीतील पदाधिकारी व संचालकांतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामभाऊ दाभाडे, माजी सरपंच वसंतकाका जाधवराव, माजी उपसरपंच मंदाकिनी जाधवराव यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी योगेश गलबत्ते, अशोक जगताप, बाळकृष्ण लोंढे, कैलास खरपुडे, सतीश थिटे, गणेश निकम, संजय शेट्टी, पौर्णिमा कुडाळकर, खुशवंत सिंग, अक्षय जोशी, समीर नाईक, बाळासाहेब पवार, संजय कुबल, सुनील खपके, दिलीप गुलाबे, मनीषा कुबल, वैशाली काटे, वंदना देशमुख, मनीषा देशमुख, श्वेता शिंगाडे आदी मान्यवर उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून दीपक मुंडे यांनी कामकाज पाहिले.
सर्व संचालक व पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, माजी उपसरपंच राजेंद्र सातव पाटील, पुणे जिल्हा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संदीप सातव, उद्योजक बापूसाहेब कंद, आदींनी अभिनंदन केले आहे.
“कमल बाग सोसायटी बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व सभासद व मान्यवर यांच्या आशीर्वादाने सोसायटीमधील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे.” – संतोष देशमुख (चेअरमन, कमलबाग सोसायटी वाघोली)