Israel Hamas War : इस्रायलने हमास विरोधात छेडलेले युद्ध थांबवण्यासाठी हमासने अमेरिकेला आवाहन केले आहे. हमासचा वरिष्ठ नेता इस्माईल हनियेफ याने अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री ऍन्टनी ब्लिंकेन यांना केले आहे.
ब्लिंकेन आगामी काळात मध्यपूर्वेचा दौरा करणार आहेत. त्यावेळी इस्रायलचे आक्रमण थांवण्याचे आवाहन इस्माइल हनियेफने केले आहे. त्याने एक व्हिडीओ संदेश प्रसिद्ध केला असून त्याद्वारे ब्लिंकेन यांना हे आवाहन केले आहे.
मात्र या संदेशामध्येही हमासने माघार घेण्याची कोणतीही तयारी दाखवली नसून उलट इस्रायल आणि अमेरिकेला धमकावल्याचा सूर कायम ठेवण्यात आला आहे. गेल्या तीन महिन्यांमध्ये अमेरिकेने धडा घेतला असेल, असे त्याने आपल्या संदेशात म्हटले आहे.
अमेरिकेने इस्रायलला मदत केल्यामुळे गाझामध्ये हजारो लोकांचा नरसंहार झाला आहे. तसेच इस्रायलने गाझामध्ये युद्धगुन्हे देखील केले आहेत. आता किमान यावेळी तरी ब्लिंकेन त्यांच्या दौर् यादरम्यानयुद्ध थांबवण्यावर भर देतील आणि पॅलेस्टाईनच्या बूमीतून माघार घेतील, अशी आशा वाटते असेही हनियेफ याने म्हटले आहे.
इस्माइल हनियेपसध्या कतारमध्ये आहे. हसासच्या स्थानिक नेत्यांनी ब्लिंकेन यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करावी आणि मध्यपूर्वेमध्ये शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न करावेत, अशी सूचनाही त्याने केली आहे. मध्यपूर्वेच्या दौर् याच्या प्रारंभी ब्लिंकेन सनिवारी तुर्कीयेमध्ये दाखल झाले आहेत.
याच दौर् यादरम्यान ब्लिंकेन इस्रायलआणि वेस्ट बँकेतही जाणार आहेत. इस्राय आणि हमासच्या युद्धाची वाढती व्याप्ती लक्षात घेऊन ते काही आखाती देशांनाही भेट देणार आहेत. गाझा पट्ट्यामध्ये अधिक मदत उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ते या देशांच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा करणार आहेत.