पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांचे आवाहन…
वाघोली (प्रतिनिधी) : आव्हाळवाडी (ता. हवेली) येथे ग्रामस्थांनी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने रस्त्यावरून ये-जा करणार्या नागरिकांसाठी गावांमधील तरुण युवकांनी सॅनिटायझर कक्ष तयार केले आहेत. याच प्रमाणे आपापल्या भागात सुरक्षिततेच्या उपाययोजना राबवण्याचे आवाहन लोणीकंद पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांनी केले आहे.
आव्हाळवाडीचे माजी सरपंच प्रवीण आव्हाळे,अनंत ग्रामीण पतसंस्थेचे चेअरमन सोमनाथ आव्हाळे, ओंकार फॅबिरेकेशनचे मालक अनिल आव्हाळे, साक्षी हार्डवेअरचे मालक अरूण सातव यांनी आव्हाळवाडी गावामध्ये दोन ठिकाणी स्वखर्चाने सॅनिटायझर कक्ष तयार केले असून सुरक्षित आरोग्याच्या दृष्टीने हे कक्ष मोलाची कामगिरी करीत असल्याचे सोमनाथ आव्हाळे यांनी सांगितले