युक्रेन आणि रशियामधील युद्धाचा आज आठवा दिवस आहे. रशिया दिवसेंदिवस आक्रमक होत आहे. या दरम्यान युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी रशियावर जोरदार हल्ला चढवला आहे. रशियाचे केवळ चार मित्र आहेत यामध्ये उत्तर कोरिया, इरिट्रिया, सीरिया आणि बेलारूसचा समावेश आहे. असे झेलेन्स्की म्हणाले आहेत. या चार देशांनी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत रशियाविरोधातील ठरावात रशियाच्या बाजूने मतदान केले होते. या ठरावात युक्रेनमधून रशियन सैन्य मागे घेण्याची मागणी करण्यात आली होती.
पराभूत होईल शत्रू :अध्यक्ष झेलेन्स्की
युक्रेनचे राष्ट्राध्यक्षही नतमस्तक होण्याच्या मनस्थितीत नसल्याचे दिसून येत आहे. जनतेला संदेश देताना ते म्हणाले की, सर्व घुसखोरांनी समजून घ्या की त्यांना येथे काहीही मिळणार नाही. रशियाने कितीही सैनिक टाकले तरी आम्ही झुकणार नाही. आमच्या शत्रूचा पराभव होईल. असा विश्वास जनतेशी संवाद साधताना झेलेन्स्की यांनी व्यक्त केला आहे.