नवी दिल्ली – तळीरामांसाठी सुखद बातमी समोर आली आहे. दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर लवकरच दारू उपलब्ध होणार आहे. याबाबत उत्पादन शुल्क विभागाने कार्यवाही सुरू केली आहे. विमानतळावरील दारूची दुकाने प्रत्यक्ष पडताळणीनंतर दोन दुकानांना परवाने देण्यात आले आहेत. ही दुकाने 10 मार्चपासून सुरू होणार आहेत.
दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उत्पादन शुल्क विभागाने दोन दुकानांना दारूचे दुकान उघडण्यासाठी परवाने दिले आहेत. विभागाने प्रत्यक्ष पडताळणी करून या दुकानांना परवाने दिले आहेत. याशिवाय होळीपूर्वी इतर दुकाने सुरू करण्याचे काम सुरू आहे. प्रत्यक्ष पडताळणी या आठवड्यात पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. दिल्लीत गेल्या वर्षी नवीन उत्पादन शुल्क धोरण लागू करण्यात आले. त्यानंतर दिल्लीतील दारूची विक्री पूर्णपणे खासगी हातात देण्यात आली. या नवीन धोरणांतर्गत आंतरराष्ट्रीय विमानतळावर 24 तास मद्यविक्रीची व्यवस्था करण्यात आली आहे. जेणेकरून मद्यविक्री वाढवता येईल.
सरकारच्या म्हणण्यानुसार, आंतरराष्ट्रीय विमानतळावर 24 तास प्रवाशांची ये-जा असते. अशा परिस्थितीत याठिकाणी 24 तास दारूविक्री व्हायला हवी.जेणेकरून महसूल वसुली वाढू शकेल.