वॉशिंग्टन – अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या आगामी निवडणुकीतील संभाव्य उमेदवार भारतीय-अमेरिकन उद्योजक विवेक रामास्वामी यांची लोकप्रियता वाढली आहे. रामस्वामी यांची रेटिंग आणि ऑनलाइन निधी उभारणीत पहिल्या रिपब्लिकन अध्यक्षीय चर्चेनंतर एका दिवसात वाढ झाली.
38 वर्षीय विवेक रामास्वामी यांच्या मोहिमेनुसार, जाहीर वादविवादानंतर पहिल्या तासात साडेचार लाख अमेरिकी डॉलर्सपेक्षा जास्त रक्कम जमा केली गेली. रामास्वामी यांनी पहिल्या रिपब्लिकन अध्यक्षीय वादविवादात आपल्या अनुभवी प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकले. त्यांनी विविध मुद्यांवर जोरदार प्रहार केले आणि टाळ्या मिळवल्या. फॉक्स न्यूजनुसार, रामास्वामी हे पहिल्या रिपब्लिकन अध्यक्षपदाच्या चर्चेसाठी सर्वात जास्त गुगल केलेले उमेदवार ठरले आहेत.
विवेक रामास्वामींना न्यू जर्सीचे माजी गव्हर्नर ख्रिस क्रिस्टीज, माजी उपराष्ट्राध्यक्ष माइक पेन्स आणि दक्षिण कॅरोलिनाच्या गव्हर्नर निक्की हेली यांच्या प्रमुख तीन प्रतिस्पर्ध्यांकडून खडतर स्पर्धेचा सामना करावा लागला. रामास्वामी पुढच्या वेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपद मिळवतील अशी चर्चाही आता जोर धरत आहे.