वॉशिंग्टन :- अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत रिपब्लिकन पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी दुसऱ्या वादविवादामध्ये 7 इच्छुक उमेदवार पात्र ठरले आहेत. त्यामध्ये दक्षिण कॅरोलिना प्रांताच्या गव्हर्नर निक्की हेले, उद्योगपती विवेक रामास्वामी हे विशेष आघाडीवर आहेत.
कॅलिफोर्नियातील सिमी व्हॅलीमध्ये बुधवारी रात्री होणाऱ्या वादविवादाच्या दुसऱ्या फेरीमध्ये माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सहभागी होणार नाहीत. या वादविवादाच्या दुसऱ्या फेरीमध्ये सहभागी होणाऱ्यांमध्ये निकी हेले आणि रामास्वामी यांच्याव्यतिरिक्त फ्लोरिडाचे गव्हर्नर रॉन डीसॅंटिस, माजी उपाध्यक्ष माइक पेन्स, न्यू जर्सीचे माजी गव्हर्नर ख्रिस क्रिस्टी आणि सिनेटर टिम स्कॉट हे देखील सहभागी होण्यास पात्र ठरले आहेत. गेल्या महिन्यात झालेल्या पहिल्या फेरीसाठी एकूण 8 इच्छुक उमेदवार पात्र ठरले होते.
लोकप्रियतेच्या निकषावर ट्रम्प अजूनही इतर सर्व उमेदवारांपेक्षा पुढे मानले जात आहेत. त्यांच्या पाठोपाठ निकी हेले आणि रामास्वामी यांची लोकप्रियताही वाढते आहे.
ट्रम्प यांना पर्याय म्हणून बघितल्या जाणाऱ्या डीसॅंटिस यांच्यावर दुसऱ्या फेरीमध्ये चांगली कामगिरी करून आपली लोकप्रियता वाढवण्याचे आव्हान असणार आहे. दुसऱ्या फेरीसाठी आर्थिक धोरणांबाबत चर्चा केली जाणार आहे. हेले आणि रामास्वामी यांनी आपली उद्दिष्टे आणि धोरणे जाहीर केली आहेत.