Vivek Ramaswamy : अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारांकडून जोरदार तयारी सुरु आहे. निवडणुकीपूर्वी रिपब्लिकन पक्षाचे नेते विवेक रामास्वामी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवाराच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. अमेरिकेतील भारतीय वंशांचे विवेक रामास्वामी हे सुद्धा रिपब्लिन पक्षातून उमेदवारीबाबत इच्छूक होते. मात्र, त्यांनी आता उमेदवारी मागे घेतली आहे.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आयोवा कॉकस निवडणुकीत बाजी मारल्याने विवेक रामास्वामी यांनी राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीतून माघार घेतली. दरम्यान त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन देखील केले तसेच त्यांच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी माझा पूर्ण पाठिंबा असेल, असेही सांगितले.
BREAKING: Vivek Ramaswamy congratulates Donald Trump, drops out of the presidential race, and endorses Trump, says he will have his full support moving on. WATCH pic.twitter.com/zErWXmSOkg
— Simon Ateba (@simonateba) January 16, 2024
पुढे रामास्वामी यांनी आता ट्रम्प यांना पाठिंबा देणार असल्याचे जाहीर केले आहे. जेव्हा त्यांनी निवडणुकीतून बाहेर पडण्याची घोषणा केली तेव्हा एका महिलेने गर्दीत ओरडून त्यांना असे करू नका असे सांगितले. यावेळी ते म्हणले, “मी कुठेही जात नाही, सर्वांसोबत राहील आणि ट्रम्प यांना पाठिंबा देईल.” आयोवामधून रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाची उमेदवारी जिंकल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी, लोकांना देशावर होत असलेला हल्ला लवकरच बंद करू असे आश्वासन दिले आहे.
रामास्वामी यांना सर्वात कमी मत
ट्रम्प यांना 55 हजारांपेक्षा जास्त मते आहेत, रॉन डीसॅंटिस यांच्याकडे 23 हजारपेक्षा जास्त मते आहेत, तर दक्षिण कॅरोलिनाच्या माजी गवर्नर निक्की हेली तिसऱ्या स्थानावर राहिल्या. निक्की यांना 19.1 टक्के मत मिळाली. लोवामध्ये निवडणूक लढवणारे भारतीय वंशाचे विवेक रामास्वामी यांचा दारुण पराभव झाला. ते चौथ्या स्थानावर राहिले. रामास्वामी यांना फक्त 7.7 टक्के मत मिळाली आहेत.