पुणे – व्हिजन स्पोर्टस् सेंटर आयोजित पहिल्या व्हिजन प्रिमिअर लीग अजिंक्यपद टी-20 क्रिकेट स्पर्धेत गिरीष कोंडे याच्या धडाकेबाज 144 धावांच्या खेळीच्या जोरावर व्हिजन जॅग्वार्स संघाने सलग चौथ्या विजयासह बाद फेरीकडे वाटचाल केली. व्हिजन पॅंथर्स संघाने व्हिजन टायगर्स संघाचा पराभव करून 107 धावांनी मोठा विजय मिळवला.
या स्पर्धेत पहिल्यांदा फलंदाजी करताना व्हिजन जॅग्वार्स संघाने 20 षटकात 8 बाद 226 धावांचा डोंगर उभा केला. यामध्ये गिरीष कोंडे याने 46 चेंडूत 11 चौकार आणि 15 षटकारांसह 144 धावांची खेळी केली. या आव्हानाचा पाठलाग करताना व्हिजन व्हिजन लायन्स् संघाचा डाव 20 षटकात 9 गडी गमावून 105 धावांवर मर्यादित राहीला.
दुसऱ्या सामन्यात प्रथमेश पाटील याच्या नाबाद 82 धावांच्या जोरावर व्हिजन पॅंथर्स संघाने व्हिजन टायगर्स संघाला पराभवाचा धक्का दिला. पॅंथर्सचा हा स्पर्धेतील पहिला विजय ठरला. व्हिजन पॅंथर्सने पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 षटकात 5 गडी गमावून 167 धावांचे आव्हान उभे केले. या आव्हानाला उत्तर देताना व्हिजन टायगर्सचा डाव 12.5 षटकात 60 धावांवर कोसळला.
संक्षिप्त धावफलक (गटसाखळी फेरी )
1) व्हिजन जॅग्वार्स ः 20 षटकात 8 बाद 226 धावा. (गिरीष कोंडे 144, पुष्कर कुयाते नाबाद 21, अनिल डोमकावळे 3-27) वि. वि. व्हिजन लायन्स ः 20 षटकात 9 बाद 105 धावा. (यश कुचेकर 34, अनिकेत भोसले 25, अर्णव अमृते 3-15, आशितोष जाधव 2-34). सामनावीर ः गिरीष कोंडे.
2) व्हिजन पॅंथर्स ः 20 षटकात 5 बाद 167 धावा. (प्रथमेश पाटील नाबाद 82, पृथ्वीराज शेलार 19, मंगेश शिवात्रे 15, स्वप्निल आचगवे 3-19) वि. वि. व्हिजन टायगर्स ः 12.5 षटकात 9 बाद 60 धावा. (शिवराम यादव 11, प्रथमेश पाटील 4-1, जसवंत माळी 2-21). सामनावीर ः प्रथमेश पाटील.