रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज मध्ये ‘विरू’ची वादळी खेळी

इंडिया लीजेंड्सचा बांग्लादेश लीजेंड्सवर 10 गडी राखून विजय

रायपूर – रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज या स्पर्धेला काल (दि. 5) पासून सुरुवात झाली. या स्पर्धेतील पहिला सामना इंडिया लीजेंड्स आणि बांग्लादेश लीजेंड्स यांच्यात रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला.  इंडिया लीजेंड्सने विरेंद्र सेहवागच्या वादळी अर्धशतकाच्या जोरावर बांग्लादेश लीजेंड्सवर 10 गडी राखून मात केली.

बांग्लादेश लीजेंड्स संघाचा कर्णधार मोहम्मद रफिकने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या संघाने 19.4 षटकात सर्वबाद 109 धावा केल्या होत्या. बांग्लादेश लीजेंड्स संघाकडून सर्वाधिक धावा नजिमुद्दिनने काढल्या. त्याने 33 चेंडूत 49 धावांची खेळी साकारली. भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना विनय कुमार, प्रग्यान ओझा आणि युवराज सिंग यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. त्याचबरोबर गोणी आणि युसूफ पठाण यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

इंडिया लीजेंड्स संघाला 110 धावांचे लक्ष्य देण्यात आले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना विरेंद्र सेहवागने आपला स्वाभाविक खेळ करताना बांग्लादेश लीजेंड्सच्या गोलंदाजाचे वाभाडे काढले. त्याचबरोबर सचिन तेंडुलकर करणे त्याला संयमी साथ दिली. त्यामुळे इंडिया लीजेंड्स संघाने 10.1 षटकात बिनबाद 114 धावा करत सहज 10 गडी राखून विजय मिळवला.

यामध्ये विरेंद्र सेहवागने 35 चेंडूचा सामना करताना 10 चौकार आणि 5 षटकार ठोकत नाबाद 80 धावांची खेळी केली. त्याचबरोबर सचिन तेंडुलकरने त्याला सुरेख साथ देताना 26 चेंडूत 5 चौकार लगावून नाबाद 33 धावा केल्या. त्याचबरोबर आतापर्यंत झालेल्या तीन ही सामन्यात इंडिया लीजेंड्स संघाने विजय मिळवून 12 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान कायम राखले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.