शिवसेनेचे मुख्यमंत्री झाल्यावर सगळ्या महत्वाच्या केसेस सचिन वाझे यांच्याकडेच कशा?

मुंबई – उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात विरोधकांकडून एन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे यांचेही नाव घेतले जात आहे. अशातच मनसेही वाझे यांच्यावरून ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

मनसे नेते सचिन संदीप देशपांडे म्हणाले कि, सचिन वाझे ह्यांनी २००८ साली शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे ह्या प्रकरणाचा गूढ अधिकच वाढले आहे. सगळ्या महत्वाच्या केसेस ह्या त्यांच्या कडेच का सोपवल्या जातात??? तसेच शिवसेनेचे मुख्यमंत्री झाल्यावर सचिन वाझे पुन्हा शासकीय सेवेत कसे रुजू होतात??? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहे.

दरम्यान, मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा येथे कळवा खाडीत सकाळी साडे दहाच्या सुमारास सापडला. ते गुरूवार सायंकाळपासून बेपत्ता होते. त्यांच्या कुटुंबियांनी ठाण्यातील नौपाडा पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची फिर्याद नोंदवली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरेन हे पोलिस अधिकारी सचिन वाझे यांच्या संपर्कात होते, असा आरोप केला होता. हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाला. वाझे यांनी आपण हिरेन यांना भेटले असू शकतो पण आपल्याला नेमकेपणाने आठवत नसल्याचे सांगितले होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.