मुंबई – वीरेंद्र सेहवाग त्याच्या ट्विटमुळे नेहमीच चर्चेत असतो. मैदानापासून दूर असला तरी सेहवाग सोशल मीडियावरून शाब्दिक फटकेबाजी करताना दिसतो. आदिपुरुष चित्रपट पाहिल्यानंतर सेहवागने ट्विट केले. जे सध्या चांगलेच व्हायरल होता आहे.अनेकजण सेहवागच्या या ट्विटवर रिट्विट करून त्याला अनेक मजेशीर उत्तरे देताना दिसत आहेत.
प्रभास, सैफ अली खान आणि क्रिती सेनॉन यांचा आदिपुरुष चित्रपट प्रदर्शित होऊन एक आठवडा झाला असून चित्रपटातील संवाद आणि पात्रांच्या वेशभूषेमुळे चित्रपटाला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. रामायणाचा चुकीचा अर्थ लावणे, हॉलिवूड चित्रपटातील दृश्ये आणि रामायणातील ऐतिहासिक पात्रांच्या वेशभूषेची नक्कल केल्याने चाहते चित्रपटाची खिल्ली उडवत आहेत.
आता, क्रिकेटर वीरेंद्र सेहवागने देखील या चित्रपटाची खिल्ली उडवली आहे. यावेळी सेहवागने प्रभासच्या बाहुबली चित्रपटाशी सलग्न एक विनोद शेअर केला आहे. ‘आदिपुरुष पाहिल्यानंतर समजलं कटप्पाने बाहुबलीला का मारलं’ असं खोचक ट्विट सेहवागने यावेळी केलं आहे.
Adipurush dekhkar pata chala Katappa ne Bahubali ko kyun maara tha 😀
— Virender Sehwag (@virendersehwag) June 25, 2023
ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष या चित्रपटाने पहिल्या तीन दिवसांत एकूण 300 कोटींची कमाई केली होती, मात्र त्यानंतर चित्रपटाच्या कमाईत घट झाली आहे. रिलीजच्या आठव्या दिवशी, 23 जूनला, चित्रपटाने सर्व भाषांमध्ये केवळ 3.40 कोटी रुपयांची कमाई केली.