#CWC19 : अंतिम फेरी गाठणारच – कोहली

मॅंचेस्टर – विश्वचषक स्पर्धेतील पहिली सेमीफायनल भारत आणि न्यूझीलंडमध्ये आज होत आहे. भारतीय संघाची फलंदाजाची पहिली फळी न्यूझीलंडच्या वेगवान व भेदक माऱ्यास कशी सामोरी जाते यावरच त्यांचे उपांत्य फेरीतील लढतीमधील यशापयश अवलंबून आहे. दरम्यान, भारतीय संघ अंतिम फेरी गाठणारच असा विश्वास पत्रकार परिषदेत माध्यमांशी बोलताना कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केला आहे.

न्यूझीलंडकडे द्रुतगती गोलंदाजांचा ताफा असला तरी आमच्यावर त्याचे कोणतेही दडपण नाही. त्यांना कसे तोंड द्यायचे याची आम्हाला कला अवगत आहे. येथे आम्ही अंतिम फेरी गाठणारच यात मला कोणतीही शंका नाही. शर्मा व राहुल हे सध्या अतिशय फॉर्ममध्ये आहेत. आजही त्यांच्याकडून त्याचीच पुनरावृत्ती होईल, असे विराट कोहली याने सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here