बॉलिवुड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली यांची जोडी ही सर्वाधिक आवडत्या सेलेब्स जोडींपैकी एक आहे. हे दोघेजण कामात कितीही व्यस्त असले तरी ते एकमेकांना वेळ देत असतात.
काही दिवसांपूर्वीच विराट कोलही आणि अनुष्मा शर्मा हे दोघे एकत्रित चित्रपट पाहण्यासाठी गेले होते. याचे फोटो त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत. या फोटोत विराट-अनुष्का बसलेले दिसत आहे. हे दोघे रात्रीच्यावेळी चित्रपट पाहण्यासाठी गेले होते.
विराटने हा फोटो शेअर करत लिहिले की, “एक रात्र, या हॉटीसोबत!’ या कॅप्शनसोबत त्याने हार्टचे इमोजी शेअर केले आहेत. त्यानंतर हा फोटो खूपच व्हायरल झाला.
दरम्यान, बांग्लादेशसोबतची मालिका संपल्यानंतर विराट कोहली अनुष्मा शर्मासोबत टाईम स्पेंड करत आहे. काही दिवसांपूर्वीच हे कपल विराटचा वाढदिवस साजरी करण्यासाठी भूतानला गेले होते. या ठिकाणी काढलेल्या फोटोंनी सोशल मीडियावर खूपच प्रसिद्धी मिळविली होती.
दुसरीकडे अनुष्मा शर्माने सध्या चित्रपटांमधून ब्रेक घेतला आहे. यापूर्वी तिच्या “झिरो’ हा चित्रपट गतवर्षीच्या अखेरीस प्रदर्शित झाला होता. यात तिच्यासोबत शाहरुख खानने मुख्य भूमिका साकारली होती.