Viral Video – दयाळू लोक जगासाठी नेहमीच वरदान ठरतात. लोकांचा असा विश्वास आहे की ते त्यांच्या दयाळूपणा आणि निःस्वार्थ कृतीने कोणाचाही दिवस चांगला बनवू शकतात. सोशल मीडियावर अशाच एका दयाळूपणाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. एक माणूस कचरा कुंडीत अन्न शोधत होता, तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या एका मुलीने त्याला कचऱ्यातून अन्न शोधण्यापासून थांबवले आणि मग असे काही केले, जे पाहिल्यानंतर तुम्ही मुलीला शाब्बासकी द्याल.
View this post on Instagram
– भुकेल्या माणसाच्या मुलीने केली मदत
सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जर हे दृश्य कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाले नसते, तर तुमचा यावर सहजासहजी विश्वास बसला नसता. व्हिडिओमध्ये एक भुकेलेला माणूस जेवणासाठी इकडे तिकडे भटकत असल्याचे दिसत आहे. मग तो एका कचराकुंडीत अन्न शोधू लागतो. त्याला पाहून तिथं गाणारी एक मुलगी तिचं गाणं थांबवते आणि तिच्या टोपलीतून पैसे काढून त्याला देते. जेणेकरून तो एका खाद्यपदार्थाच्या दुकानात जाऊन काहीतरी विकत घेऊन खाऊ शकेल. या व्हिडिओने अनेक लोकांची मने जिंकली आहेत.
– सोशल मीडियावर कौतुक
हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. सिंगर लिव्ह हारलँडने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर अपलोड केला आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये लक्ष देऊन पाहिले तर, जेव्हा लिव्हने त्याला पैसे दिले, तेव्हा तो त्याचे आभार मानतो. त्यांनी त्यांच्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘कर्म ही एक महान गोष्ट आहे! नेहमी दयाळू राहा आणि दयाळूपणा नक्कीच परत मिळेल.’ हा व्हिडिओ हजारो जणांनी पाहिला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक त्याचे कौतुक करत आहेत. कमेंट बॉक्समध्ये युजर्सकडून मुलीच्या दयाळू स्वभावाचे प्रचंड कौतुक केले जात आहे.