Nora Fatehi Viral Video| बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही तिच्या बोल्ड अंदाजामुळे नेहमीच चर्चेत असते. लवकरच ती ‘मडगाव एक्सप्रेस’ या सिनेमात पाहायला मिळणार आहे. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी ती अनेक ठिकाणी भेट देत आहे. नुकतेच या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त नोराने मेट्रोतून प्रवास केला. इतकेच काय तर यावेळी ती चाहत्यांसोबत थिरकतानाही दिसली.
‘मडगाव एक्सप्रेस’चे दिग्दर्शक कुणाल खेमु आणि नोरा फतेही मेट्रो स्टेशनवर पोहचले होते. यावेळी नोराने मेट्रोतून प्रवास केला. तिला पाहण्यासाठी चाहत्यांची देखील मोठी गर्दी जमली होती. यावेळी तिने चाहत्यांसोबत डान्स केला. सध्या तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये नोरा ब्लॅक आणि गोल्डन लूकमध्ये दिसत आहे. Nora Fatehi Viral Video|
View this post on Instagram
यादरम्यान, अभिनेत्री संपूर्ण टीमसोबत मोठ्या उत्साहात नाचत आहे. नोराचा हा व्हिडिओ पाहून एकीकडे चाहते तिचे कौतुक करत आहेत, तर दुसरीकडे अनेक सोशल मीडिया यूजर्स संतापले असून अभिनेत्रीवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करत आहेत.
खरे तर, मुंबई मेट्रोसारख्या सार्वजनिक ठिकाणी असे उपक्रम योग्य नसल्याचे सोशल मीडिया यूजर्सचे मत आहे. नोराच्या व्हिडीओवर एका यूजरने लिहिले – ‘सामान्य लोकांना अशा गोष्टी करण्याची परवानगी नाही, परंतु या सर्व कृतीची सर्व सोशल मीडियावर प्रशंसा होत आहे.’ दुसऱ्या युजरने कमेंट केली – ‘त्यांना अटक करा, मेट्रोमध्ये हे चुकीचे आहे.’ Nora Fatehi Viral Video|
दरम्यान, ‘मडगाव एक्सप्रेस’ सिनेमातून अभिनेता कुणाल खेमू दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. या सिनेमात नोरा फतेही, प्रतिक गांधी, दिव्येंदू शर्मा, करीना कपूर, विकी कौशल, अविनाश तिवारी हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर मराठमोळा उपेंद्र लिमये देखील या सिनेमात झळकणार आहे. 5 मार्च रोजी मडगाव एक्सप्रेसचा ट्रेलर रिलीज झाला होता. त्यानंतर हा चित्रपट 22 मार्चला प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा:
समृद्धी महामार्गावरील अपघाताचे सत्र सुरूच; रासपच्या जिल्हाध्यक्षांसह दोघांचा जागीच मृत्यू