न्यूयॉर्क : पंतप्रधान मोदी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. या भेटीदरम्यान मोदी अनेक दिग्गज नेतेमंडळी आणि उद्योजकांची भेट घेणार आहेत, यासोबतच आज ते अमेरिकन काँग्रेसमध्ये ते संबोधित देखील करणार आहेत. मोदींच्या भाषणाकडे सर्व जगाचे लक्ष लागलेले आहे. मात्र अमेरिकेच्या एका खासदारानेच मोदींवर सडकून टीका केली आहे.
अमेरिकेन काँग्रेसच्या सदस्य खासदार इल्हान अब्दुलाही उमर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणावर बहिष्कार टाकला आहे. त्यांनी ट्वीट करत नेरेंद्र मोदी यांना धार्मिक अल्पसंख्याकांवर दडपशाही करणारा नेता म्हटले आहे.’
Prime Minister Modi’s government has repressed religious minorities, emboldened violent Hindu nationalist groups, and targeted journalists/human rights advocates with impunity.
I will NOT be attending Modi’s speech.
— Ilhan Omar (@IlhanMN) June 20, 2023
‘
पुढे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये,”पंतप्रधान मोदींच्या सरकारने धार्मिक अल्पसंख्याकांवर दडपशाही केली आहे, हिंसक हिंदू राष्ट्रवादी गटांना प्रोत्साहन दिले आहे आणि पत्रकार/मानवाधिकार वकिलांना लक्ष्य केले आहे. मी मोदींच्या भाषणाला उपस्थित राहणार नाही. मोदींच्या दडपशाही आणि हिंसाचाराबद्दल चर्चा करण्यासाठी मी मानवाधिकार गटांसोबत एक ब्रीफिंग घेणार आहे,” असेही त्यांनी म्हटले आहे.
कोण आहेत इल्हान उमर?
इल्हान उमर २०१९ पासून मिनेसोटाच्या ५व्या कांग्रेसनल डिस्ट्रिक्टच्या अमेरिकेच्या प्रतिनिधी म्हणून काम करत आहेत. उमर यांचा जन्म सोमालिया येथे झाला असून त्या एक निर्वासीत आहेत.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अमेरिकन काँग्रेसच्या संयुक्त अधिवेशनात दुसऱ्यांदा संबोधित करणार आहेत. यापूर्वी त्यांनी जून २०१६ मध्ये देखील येथे भाषण केलं होतं. हा बहुमान मिळालेले ते एकमेव भारतीय नेते आहेत तर जगात त्यांचा चौथा क्रमांक लागतो.