विकास दुबे शोध मोहीम: दुबेच्या साथिदाराचा खात्मा

अन्य एकाला जखमी अवस्थेत अटक; दोन चकमकी

लखनौ : कानपूरमध्ये आठ पोलिसांची निर्घूण हत्या करणाऱ्या कुख्यात गॅंगस्टर विकास दुबे याच्या एका साथिदाराला पोलिसांच्या विशेष पथकाने कंठस्नान घातले. हा साथिदार पोलिसांच्या हत्याकांडात सहभागी होता, असे समजते.

हमीरपूर जिल्ह्यातील मौदाहा गावात ही चकमक उडाली. त्यात अमर दुबे हा त्याचा साथिदार मरण पावला. त्याच्यावर पोलिसांनी 25 हजार रुपयांचे इनाम जाहीर केले होते. दुबेला कंठस्नान घातल्यानंतर काही वेळातच पोलिसांनी कानपूरच्या चौबेयपूर भागातून त्याच्या आणखी एका सीातदाराला अटक करण्यात आली. श्‍यामु वाजपेयी असे त्याचे नाव आहे. त्याच्यावरही पोलिसांनी 25 हजार रुपयांचे इनाम जाहीर केले होते, पोलिसांनी केलेल्या गोळीबारात त्याच्या डाव्या पायात गोळी घुसली आहे, असे विशेष पथकाचे अधिकारी के. एम राय यांनी सांगितले.

विकास दुबे याला अटक करण्यासाठी पोलिस गेले असता त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. त्यात आठ पोलिस मरण पावले होते. घराच्या छतावरून त्याने अंदाधूंद गोळीबार केला होता. दुबेची माहिती देणाऱ्यास पोलिसांनी अडीच लाख रुपये इनाम जाहीर केले आहे. तो अद्याप फरार आहे

आम्ही दुबेला कोणत्याही परिस्थितीत गजाआड करू. त्याच्या पर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
के. एम. राय पोलिस अधिकारी

Leave A Reply

Your email address will not be published.