पाकमध्ये फेरविचार याचिकेस कुलभूषण जाधव यांचा नकार

पाकिस्तानचा दावा, दया अर्जावर सुनाणीची मागणी

इस्लामाबाद : कुलभूषण जाधव यांनी आपल्या शिक्षेवर फेरविचार याचिका दाखल करण्यास नकार दिला आहे. त्याऐवजी दया याचिका दाखल करण्याची इच्छा व्यक्त केली असल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे.

भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना फेरविचार याचिका आणि शिक्षेचे दोषी ठरवण्याबाबत याचिका दाखल करण्यासाठी 17 जून 2020 ला आमंत्रित करण्यात आले होते. त्याचा कायदेशीर हक्क देण्याची संधी त्यांना देण्यात आली. मात्र त्यांनी फेरविचार याचिका दाखल करण्यास नकार दिला, असा दावा पाकिस्तानचे ऍटर्नी जनरलनी बुधवारी केला.

कुलभूषण जाधव यांनी 17 एप्रिल 2017 मध्ये दाखल केलेल्या दया याचिकेवर सुनावणी घेण्यासाठी आग्रह धरला, असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 49 वर्षीय कुलभूषण जाधव निवृत्त नौदल अधिकारी आहेत. हेरगिरी आणि दहशतवादाच्या आरोपावरून त्यांना पाकिस्तानी न्यायालयाने फाशी ठोठावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.