Maratha community – मराठा समाजाला फसवण्याचे काम सरकारने केले, हे लपून राहिलेले नाही. आमची मराठा समाजाला विनंती आहे की, उमेदवार उभे करण्यापेक्षा जो मराठा समाजासाठी आडवा येतोय त्याला आडवा करण्यासाठी निवडणूकीत मतदान करावे, असे आवाहन विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले आहे. । vijay wadettiwar
वडेट्टीवारांनी यावेळी भाजपच्या नमो रोजगार मेळाव्यावरही टिका केली. ते म्हणाले की, लोकांना वेठीस धरून खाजगी गाड्या किरायाने करून मेळावा केला. हा मेळावा कार्यकर्त्यांना बळ देणार ठरतो की लोकांना वेठीस धरणारा ठरतो याचा अर्थ मतदानातून कळेल. । vijay wadettiwar
हा पक्षाचा कार्यक्रम आहे, एवढे निवडणूकीचे बळ त्यांच्याकडे आहे की, लाख नाही दोन लाख लोक आणू शकतील, जेवढ्या गाड्या लावतील तेवढे लोक जास्त येतील, पण गाड्या लावून आणि गाडीत बसवून खाण्यापिण्याची सोय करून लोक आले तर ते पक्षाबरोबर उभे राहतात असे नाही. । vijay wadettiwar