नवी दिल्ली/कोलकाता – भोजपुरी गायक-अभिनेता पवन सिंह (Bhojpuri singer-actor Pawan Singh) यांनी रविवारी पश्चिम बंगालमधील आसनसोल मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीच्या ( Lok Sabha Election 2024) लढतीतून आपले नाव मागे घेतले आहे. त्यांना कालच या मतदार संघातून भाजपने उमेदवारी जाहीर केली होती. या घटनेवरून तृणमुल कॉंग्रेसने भाजपची खिल्ली उडवली आहे.
एक्सवरील एका पोस्टमध्ये, पवन सिंह यांनी आपल्याला उमेदवारी जाहीर केल्याबद्दल भाजप नेतृत्वाचे आभार मानले. परंतु काही कारणास्तव आपण आसनसोलमधून निवडणूक लढवू शकणार नाही, असे त्यांनी घोषित केले आहे.
त्यांच्या निर्णयामागील कारण स्पष्ट केले नसले तरी, त्यांच्या उमेदवारीवर पश्चिम बंगालमध्ये सत्तेवर असलेल्या टीएमसीकडून जोरदार टीका झाली होती. ज्यात आरोप करण्यात आला होता की त्यांची अनेक गाणी असभ्य आहेत आणि राज्यातील महिलांसह महिलांना अश्लीलतेने चित्रित केले आहे.
पवनसिंह हे महिला आणि बंगाली विरोधी आहेत. म्हणूनच भाजपने त्यांना उमेदवारी दिली होती. पण लोकांचा रोष लक्षात घेऊन त्यांना माघार घ्यावी लागली, असे तृणमूल कॉंग्रेसने म्हटले आहे. सध्या या मतदारसंघात तृणमुल कॉंग्रेसचे शत्रुघ्न सिन्हा हे लोकसभेचे सदस्य आहेत.