Vijay Vadettiwar – विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची बारामती येथे गोविंद बाग निवासस्थानी भेट घेतली. वडेट्टीवार हे बारामती येथे आयोजित राज्यस्तरीय पत्रकार अधिवेशनासाठी उपस्थित राहण्यासाठी शुक्रवारी (दि १७)रात्री पासून बारामती येथील शासकीय विश्रामगृह येथे मुक्कामी होते.
आज सकाळी ९ च्या सुमारास त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली.यावेळी पवार आणि वडेट्टीवार यांच्यात अर्ध्या तासाहून अधिक काळ चर्चा झाली .मात्र चर्चेचा तपशील समजू शकला नाही.त्यानंतर पवार यांच्या समवेत वडेट्टीवार यांनी कृषी विकास प्रतिष्ठानच्या अटल इनक्यूबेशन सेंटरला भेट देण्यासाठी निघून गेले.त्यानंतर वडेट्टीवार बारामतीत सुरू असलेल्या धनगर समाज आरक्षण प्रश्नावर सुरू असलेल्या आमरण उपोषण आंदोलनाला भेट देणारं आहेत.त्यानंतर वडेट्टीवार पत्रकारांच्या राज्यस्तरीय अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत.