priyanka chahar choudhary – टीव्ही मालिका ‘उडारियां’ अभिनेत्री आणि ‘बिग बॉस 16’ ची स्पर्धक प्रियांका चहर चौधरीची फॅन फॉलोइंग खूप मजबूत आहे. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची लांबलचक रांग आहे आणि या लोकांना प्रियंका खूप आवडते. पण नुकतेच प्रियांकाने तिचे काही फोटो शेअर केले आहेत, जे पाहून तिचे चाहते खूपच नाराज झाले आहेत. लोकांना तिच्या आवडत्या अभिनेत्रीचा हा अवतार आवडलेला नाही.
View this post on Instagram
प्रियांकाने नुकतेच इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले. ज्यामध्ये ती काळ्या रंगाची ट्यूब स्टाइल मोनोकिनी परिधान केलेली दिसते. प्रियांका सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांसाठी लेटेस्ट फोटो शेअर करत असते, पण तिने पहिल्यांदाच असे हॉट फोटो शेअर केले आहेत या बोल्ड फोटोवर चाहते प्रचंड संतापले. अभिनेत्रीच्या छायाचित्रांबाबत युजर्स म्हटले आहे की, ‘या अवतारात ती अजिबात चांगली दिसत नाही.’ तर तिचा को-स्टार आणि कथित बॉयफ्रेंड अंकितने तिची प्रशंसा केली आहे.
एका युजरने लिहिले, “मला तू खूप आवडतेस पण तू या ड्रेसमध्ये अजिबात छान दिसत नाहीये.” तर एक युजर्सने लिहिले आहे की ‘जेवढे प्रसिद्ध तेवढे छोटे कपडे असं म्हणत तिला आता सोशल मीडियावर अनेकांनी ट्रोल केले आहे. प्रियांकाचा ‘उदारियां’ सहकलाकार आणि कथित बॉयफ्रेंड अंकित गुप्ता याने तिची प्रशंसा केली आहे. अंकितने लिहिले, “हॉटनेस…” यासोबतच त्याने फायर इमोजीही पोस्ट केले आहेत.
दरम्यान, प्रियांका आणि अंकित बिग बॉस 16 मध्ये एकत्र दिसले होते. पण त्यांची जोडी टीव्ही मालिका ‘उदारियां’ने प्रसिद्ध झाली. चाहत्यांना त्यांना एकत्र पाहणे खूप आवडते, त्यामुळे दिवाळीच्या निमित्ताने दोघांनी इंस्टाग्रामवर एक रोमँटिक रील शेअर केली आहे. ज्यावर जवळपास 9 लाख लाईक्स आले आहेत.