Chandrapur Lok Sabha| चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ जिंकण्यासाठी भाजपने मोठी तयारी केली आहे. भाजपकडून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवण्यात आले आहे. तर काँग्रेसने दिवंगत खासदार बाळू धानोकर यांच्या पत्नी व आमदार प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
गेल्या वेळी राज्यात काँग्रेसने एकमेव जिंकलेला चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ हा होता. आता हा मतदार संघ जिंकण्यासाठी नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी चंद्रपूरात जाहीर सभा झाली होती. चला तर मग चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचा थोडक्यात इतिहास जाणून घेऊयात…
चंद्रपूर लोकसभा मतदार संघात एकूण सहा विधानसभेच्या जागा Chandrapur Lok Sabha|
चंद्रपूर लोकसभा मतदार संघात विधानसभेच्या एकूण सहा जागा आहेत. लोकसभा क्षेत्रात चंद्रपूर, बल्लारपूर, राजुरा, वरोरा, वणी व आर्णी हे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. यामध्ये बल्लारपूर, वणी व आर्णी या तीन मतदारसंघात भाजपचे तर राजुरा व वरोरा या दोन ठिकाणी काँग्रेसचे आमदार आहेत.
1951-1952 मध्ये देशात पहिल्यांदा लोकसभेच्या निवडणुका झाल्या, तेव्हा या जागेचाही त्यात समावेश करण्यात आला. मुल्ला अब्दुल्लाभाई ताहेरअली हे काँग्रेस पक्षाचे पहिले खासदार म्हणून निवडून आले. 1998-99 मध्येही येथे काँग्रेस जिंकली होती. त्यानंतर 2004 ते 2014 पर्यंत ही जागा भाजपच्या ताब्यात राहिली आणि येथून हंसराज अहिर खासदार होते. त्यानंतर 2019 च्या निवडणुकीत काँग्रेसचे येथून सुरेश नारायण धानोरकर भाजपाच्या उमेदवाराचा पराभव करुन विजय मिळवला होता.
धानोकर विरुद्ध मुनगंटीवार लढत Chandrapur Lok Sabha|
यंदा प्रतिभा धानोरकर यांना लोकसभा निवडणुकीसाठी संधी देण्यात आली आहे. तर भाजपकडून मुनगंटीवार रिंगणात उतरले आहेत. या दोन प्रमुख उमेदवारांसह वंचित बहुजन आघाडीचे राजेश बेले व बसपचे राजेंद्र रामटेके यांच्यासह १५ उमेदवार रिंगणात आहेत.
मागील वेळीस भाजपमय वातावरण असतानाही बाळू धानोरकर हे विजयी झाले होते. तर यंदा काँग्रेसमध्ये प्रतिभा धानोरकर आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची कन्या शिवानी यांच्यात उमेदवारीवरून संघर्ष झाला होता. शेवटी पक्षाने धानोरकर यांना संधी दिली. त्यामुळे यंदा धानोकर विरुद्ध मुनगंटीवार अशी मुख्य लढत पाहायला मिळणार आहे.
हेही वाचा:
‘आम्ही चिंतित…’ ; इराणच्या इस्रायलवरील हल्ल्यावर भारताची प्रतिक्रिया, जाणून घ्या काय म्हणाले?