Pratibha Dhanorkar| आगामी लोकसभेच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्ष तयारी लागले आहेत. काँग्रेसकडून काल रविवारी लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. यात चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडून आमदार प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. खासदारपदी असताना निधन झालेल्या बाळू धानोरकर यांच्या पत्नी आणि विद्यमान काँग्रेस आमदार प्रतिभा धानोरकर यांना संधी दिल्याने अनेकांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
माय-लेकांना अश्रू अनावर Pratibha Dhanorkar|
लोकसभेचे तिकीट मिळाल्यानंतर प्रतिभा धानोरकर पहिल्यांदा नागपुरात आल्या. यावेळी त्यांचं स्वागत करताना कार्यकर्ते, पदाधिकारी, सहकारी, कुटुंबीय यांच्यासह प्रतिभा धानोरकर भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी लेकाने त्यांना घट्ट मिठी मारताच माय – लेकांना अश्रू अनावर झाले. तसेच त्या पतीच्या आठवणीत भावुक झाल्या.
लोकशाही विरुद्ध हुकूमशाही लढाई
त्या म्हणाल्या की, “2019 च्या निवडणुकीत असाच संघर्ष बाळू धानोरकर यांना करावा लागला होता. दहा महिन्यापूर्वी त्यांचं निधन झालं. पतीच्या निधनानंतर ही जबाबदारी माझ्या खांद्यावर आली. त्यांनी सर केलेला हा गड मी कायम राखीन, हा विश्वास मला वाटतो. सुधीरभाऊ मुनगंटीवार हे राजकारणातील दिग्गज नेते माझ्यासमोर आहेत. राजकारणाचा दांडगा अनुभव त्यांना आहे. त्यामुळे माझ्यासाठी ही लढाई सोपी नाही. ही लोकशाही विरुद्ध हुकूमशाही लढाई आहे. संघर्षाशिवाय माणूस मजबूत होत नाही. ही लढाई वैयक्तिक नाही. राजा बोले प्रजा हाले असा काँग्रेस पक्ष नाही, असंही प्रतिभाताई म्हणाल्या.
यावेळी त्यांनी सर्व पक्षश्रेष्ठींचे, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. परंतु यावेळी त्यांनी विरोधीपक्ष नेते आणि चंद्रपूरचे वजनदार व्यक्तिमत्त्व विजय वडेट्टीवार यांचं नाव घेणं टाळले. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, चंद्रपूर मतदार संघातून प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी जाहीर झाल्याने लेक शिवानी वडेट्टीवार यांच्यासाठी फील्डिंग लावणारे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांची निराशा झाल्याची चर्चा आहे. Pratibha Dhanorkar|
यावेळी प्रतिभा धानोरकर यांना विजय वडेट्टीवार यांच्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर “पक्षाची काही ध्येयधोरणं आहेत. आमचा पक्ष लोकशाहीवर, राज्यघटनेवर चालणारा आहे. त्यांना उमेदवारी मिळाली असती, तर पक्षश्रेष्ठींनी जो आदेश दिला असता, तो मी फॉलो केला असता, मला उमेदवारी मिळाली, तर तो आदेश तेही फॉलो करतील,”अशी भूमिका प्रतिभा धानोरकर यांनी स्पष्ट केली.
हेही वाचा:
भारतीय विद्यार्थिनीला लंडनमध्ये ट्रकने चिरडलं ; अपघातात जागीच मृत्यू