Bollywood News अभिनेता विजय सेतुपती हा साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात प्रतिभावान अभिनेत्यांपैकी एक आहे. शाहरुख खानच्या ‘जवान’ या चित्रपटातील ‘काली’ या भूमिकेतून या अभिनेत्याने प्रेक्षकांची मने जिंकली होती. ‘जवान’च्या यशादरम्यान विजयची एक जुनी मुलाखत व्हायरल झाली होती, ज्यामध्ये त्याने प्रसिद्ध अभिनेत्री क्रिती शेट्टीसोबत काम न करण्याचे कारण सांगितले होते.
क्रितीने सुपरहिट चित्रपट ‘उप्पेना’मधून चित्रपटांमध्ये पदार्पण केले. नानीच्या ‘श्याम सिंघा रॉय’ आणि नागा चैतन्यच्या ‘बंगाराजू’मध्ये भूमिका करून तिने आघाडीची महिला स्टार म्हणून आपला ठसा उमटवला. ‘उप्पेना’मध्ये क्रितीने विजय सेतुपतीने साकारलेल्या ‘रायनम’च्या मुलीची ‘संगीता’ उर्फ ‘बेबम्मा’ची भूमिका साकारली होती. Vijay Sethupathi , Krithi Shetty , Girlfriend, Romance , Bollywood News
दरम्यान ‘लभम’ या अॅक्शन चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान, विजय सेतुपतीने खुलासा केला की चित्रपटाच्या निर्मात्यांना त्याची कृतीसोबत जोडी करायची होती. विजयला त्याच्या मुलीची भूमिका करणार्या अभिनेत्रीसोबत जोडी बनवणे सोपे नव्हते. वयातील फरकामुळे विजय तिला आपली मुलगी मानत होता. अशात तो तिच्यावर कधीही ऑनस्क्रीन रोमान्स करू शकत नाही. एका मुलाखतीत विजय म्हणाला होता, “जेव्हा मी लभमचे शूटिंग करत होतो, तेव्हा निर्मात्यांनी सांगितले की ते क्रिती शेट्टीला या चित्रपटात मुख्य भूमिकेसाठी कास्ट करण्याचा विचार करत होते. त्यावेळी ‘उप्पेना’ देखील बनवला जात होता.” Vijay Sethupathi , Krithi Shetty , Girlfriend, Romance , Bollywood News
विजयने सांगितले की,’जेव्हा मी लाभमचे शूटिंग करत होतो तेव्हा मला सांगण्यात आले की या चित्रपटासाठी कृति शेट्टीला कास्ट करण्याचा विचार करत आहे. त्यावेळेतच ‘उप्पेना’ चित्रपटाचे शूटिंग सुद्धा सुरु होते. ‘उप्पेना’ चित्रपटात कृती माझ्या मुलीची भूमिका साकारत होती. त्यामुळे एक चित्रपटात मुलीच्या भूमिकेत तर दुसऱ्या प्रेमिकेच्या भूमिकेत तिने माझ्यासोबत काम करावे असं मला चुकीचे वाटतं होते. त्यामुळे मी कृतीला लाभम चित्रपटात प्रेमिकेच्या भूमिकेसाठी नकार दिला. Vijay Sethupathi , Krithi Shetty , Girlfriend, Romance , Bollywood News