shahrukh khan dhoom 4 | बॉलीवूड किंग शाहरुख खानने 2023 मध्ये आपल्या खास आणि वेगळ्या शैलीने लोकांना खूप प्रभावित केले. रोमान्सचा बादशाह मानल्या जाणाऱ्या किंग खानने यावर्षी आपल्या चित्रपटांमध्ये अॅक्शनवर अधिक भर दिला. त्याचाच परिणाम असा झाला की, आता त्याला 2024 साठीही मोठ्या ऑफर्स मिळू लागल्या आहे, रिपोर्टनुसार, प्रसिद्ध फ्रँचायझी धूम 4 मध्ये हृतिक आणि जॉननंतर शाहरुख उतरणार आहे
जानेवारी 2023 मध्ये रिलीज झालेल्या शाहरुख खानच्या पठाण चित्रपटात तो अॅक्शन करताना दिसला होता. मात्र, याआधीही त्याने आपल्या चित्रपटांमध्ये काही अॅक्शन सीन केले आहे पण पठाण हा पॉवर पॅक्ड अॅक्शन चित्रपट होता.
आता धूम 4 बद्दल चर्चा आहे की या चित्रपटात किंग खान अॅक्शन मोडमध्ये दिसणार आहे. याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झाली नसली तरी सोशल मीडियावर जोरदार प्रतिक्रिया येत आहे.
शाहरुख खानला त्याच्या चाहत्यांची मनं कशी जिंकायची हे चांगलंच माहीत आहे. तो प्रत्येक चित्रपटात असे काहीतरी करतो जे लोकांच्या मनात घर करून राहते. आता धूम 4 बाबत चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 2018 मध्ये झिरो या शेवटच्या चित्रपटानंतर पठाण चित्रपटाने शाहरुखला पुन्हा एकदा चाहत्यांचे प्रेम दिले आहे,
सध्या शाहरुख खान त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या डंकी या चित्रपटामुळे चर्चेत आहे. जगभरात या चित्रपटाची क्रेझ पाहायला मिळत आहे. 21 डिसेंबरला रिलीज झालेला डंकी पहिल्या आठवड्यातच 300 कोटींच्या क्लबच्या जवळ पोहोचला आहे. याआधी, त्याने वर्षाची सुरुवात पठाणसोबत केली जी बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरली. त्यानंतर जवानानेही चाहत्यांना खूप प्रभावित केले. आता डंकीसह त्याने हॅट्ट्रिक पूर्ण केली आहे.