आपल्या ऍक्शन आणि बॉडी फिटनेससाठी ओळखला जाणारा बॉलीवूड अभिनेता विद्युत जामवाल याने आपल्या अपर बॉडी स्ट्रेंथचे रहस्य चाहत्यांशी शेअर केले आहे. विद्युतने कलारी डॅंड (मार्शल आर्ट, कलरीपयाट्टुचा भाग) चा एक व्हिडिओ यू-ट्युब चॅनलवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओतून त्याने आपल्या चाहत्यांना “जॅमवेलियंस’बाबत माहिती दिली आहे.
ऍक्शन अभिनेता विद्युत म्हणाला, पुश-अप्ससाठी जॅमवेलियंसची ओळख करून द्यायची आहे आणि मला वाटते की, हे करण्यासाठी उत्तम मार्ग म्हणजे कलारी डॅंडचे प्रात्यक्षिक करणे होय. हे कोर, पाठ, छाती, खांदे, पाय आणि ट्रायसेप्सला फायदेशीर आहे. हे सर्व वर्कआऊट्सचे हंबलेस्ट आहे.
तो म्हणाला की, हा वर्कआऊट सर्वोत्कृष्ट आहे. कारण यासाठी आपणाला कोणत्याही व्यायामशाळेत जाऊन अवजड इक्युपमेंट उचलण्याची गरज नाही. यासाठी हवे आहे ते फक्त मोकळे मैदान. अगदी सोप्या पद्धतीत सांगायचे झाल्यास सर्वांना हेच म्हणणे आहे की, आपण ग्राउंडेड राहावे.
वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास विद्युत जामवाल लवकरच फारूक कबीर द्वारा दिग्दर्शित “खुदा हाफिज’ चित्रपटात झळकणार आहे.