मंचर, (प्रतिनिधी) – मंचर (ता. आंबेगाव) येथील विद्या विकास मंदिर अवसरी बुद्रुक येथे घेण्यात आलेल्या इतिहास प्रज्ञाशोध परीक्षेत विद्यालयातील इयत्ता ५ वी ते १०वी पर्यंतच्या ९५० विद्यार्थ्यांनीं सहभाग घेतला होता. त्यापैकी ७६० विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले, अशी माहिती विद्यालयाचे प्राचार्य अंकुश शिंगाडे यांनी दिली.
शिक्षक महामंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत इयत्तानुसार प्रथम आलेले इतिहास विद्यार्थी इयत्ता पाचवीमध्ये अभिराज अनिल सुक्रे ७२ गुण, संस्कृती अनिल गावडे ७२ गुण, इयत्ता सहावीत कुमुद कपिल थोरात ७० गुण, इयत्ता सातवीत आर्यन योगेश राक्षे ८२ गुण, इयत्ता आठवीत पायल आनंदराव भोजने ८२ गुण, प्रांजल नरेंद्र बोंबे ८२ गुण, इयत्ता नववीमध्ये श्रावणी सुनील गावडे ९७ गुण आणि इयत्ता दहावीमध्ये श्रावणी सदानंद चव्हाण ९७ गुण घेऊन सर्वप्रथम आले.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे विद्यालयाच्या पर्यवेक्षिका माधुरी खानदेशे यांनी सर्वांचे प्रमाणपत्र देऊन अभिनंदन केले. तसेच या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे इयत्ता ५ वी ते १० वीपर्यंतचे शिक्षक, विभाग प्रमुख सचिन रोकडे, शिवदास पवार, सुदर्शन शेवाळे, श्रीकांत लेंभे, मंगल कुंभार,
कविता गावडे, चौधरी वैशाली, सोनाली पाष्टे यांनी सदर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष अँड विष्णूकाका हिंगे पाटील, कार्यध्यक्ष,सचिव,सहसचिव सर्व संचालक यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे अभिनंदन केले.