Vidya Balan : अभिनेत्री विद्या बालनने उत्तम अभिनयाने लाखो लोकांची मनं जिंकली आहेत. ती नेहमी सोशल मीडियाद्वारे लोकांच्या संपर्कात राहते. सोशल मीडियावर तिचे अनेक फॉलोअर्स आहेत. तिच्या चित्रपटांमुळे ती नेहमीच चर्चेत राहिली आहे. मात्र सध्या ती एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्री विद्या बालनच्या नावाने इंस्टाग्रामवर फेक अकाउंट चालवलं जात आहे. याची माहिती स्वत: विद्याने सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना दिली आहे.
चाहते अनेकदा त्यांच्या आवडत्या स्टार्सच्या नावाने इन्स्टाग्रामवर फॅन पेज अकाऊंट चालवतात. पण एक युजर विद्या बालनच्या नावाने बनावट इंस्टाग्राम अकाउंट चालवत आहे. याबाबतची माहिती देत विद्याने तिच्या पोस्टमध्ये लिहिले की, “सर्वांना नमस्कार… आधी फोन नंबर आणि आता कोणीतरी माझ्या नावाने खाते चालवत आहे. या अकाऊंटवरून तो माझ्या नावाने लोकांशी संपर्क साधत आहे. माझी टीम आणि मी ते कळवले आहे. तुम्ही हे खाते देखील कळवावे आणि ब्लॉक करावे. हे आमच्यासाठी खूप चांगले असेल. तो माझ्या अनेक मित्रांशी बोलत आहे. आता तुम्ही तक्रार करून हे अकाऊंट ब्लॉक करा,’ असे आवाहन विद्या बालनने केले आहे.
विद्या बालनने सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि अनेक कॉमेडी रील्स देखील शेअर करते. चाहत्यांनाही त्याचे फनी रील्स खूप आवडतात. मात्र तिचे फेक अकाऊंट ओपन करण्यात आल्याने तिने चाहत्यांना सतर्क राहण्यास सांगितले आहे.
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, विद्या बालनने भूलभूलैया, द दर्टी पिक्चर या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. लवकरच ती ‘दो और दो प्यार’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत इलियाना डिक्रूझही दिसणार आहे. हा चित्रपट 29 मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.