अमित शहांच्या राज्यात 18 सभा -चंद्रकांत पाटील
मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकिय पक्षांनी कंबर कसली आहे. प्रत्येक पक्षाची व्यूहरचना तयार झाली असून त्यानुसार प्रचार होणार असल्याचे दिसत आहे. त्यातच आता राज्यातील भाजपच्या प्रचारासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यात सभा घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. राज्यातील निवडणुकांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 9 सभा होणार असून त्यात17 ऑक्टोबर रोजी पुण्यात आणि साताऱ्यात सभा होणार असल्याचे म्हटले जात आहे.
राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 9 तर देशाचे गृहमंत्री अमित शहा 18 सभा घेणार आहेत. दरम्यान, पंतप्रधानांच्या या सभा नेमक्या कुठे होणार यासाठी कार्यकर्ते उत्सूक असले तरी या 9 सभांमधील दोन सभा पश्चिम महाराष्ट्राच एकच दिवशी होणार आहेत अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. येत्या 17 ऑक्टोबरला या दोन सभा होणार असल्याचे त्यांनी म्हटले. दरम्यान, हरियाणातील निवडणुकांमुळे पुण्यातील सभेची तारिख नक्की होत नव्हती परंतु, आता ही तारिख नक्की झाली असून लवकरच याचे ठिकाण ठरवण्यात येणार असल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.