मुंबई – दिग्गज अभिनेते अनुपम खेर यांनी नुकताच एक भन्नाट व्हिडीओ शेअर केला आहे. ज्याची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे. या व्हिडिओमध्ये दिवंगत अभिनेते अमरीश पुरी देखील दिसत आहेत. विशेष म्हणजे या व्हिडिओमध्ये दोघेही आपल्या टकले पणावर भाष्य करत आहेत. खेर यांचा हा व्हिडीओ चाहत्यांना प्रचंड आवडला आहे.
ही क्लिप एका अवॉर्ड फंक्शनची आहे.अनुपम खेर यांनी आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. या क्लिपमध्ये ते माईक घेऊन टक्कल पडण्यावर गाणे गाताना दिसत आहे.दोघांच्या अप्रतिम जुगलबंदीचं दृश्य या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे.व्हिडिओमध्ये अनुपम खेर आणि अमरीश पुरी या दोघांची अनोखी स्टाईल देखील दिसत आहे.
“यादों के पुलंदों से, हे गाणे काही वर्षांपूर्वी एका स्टेज शोमध्ये गायले होते. टक्कल पडलेल्या लोकांची चेष्टा केली. अमरीशजींच्या हसण्यात खूप निरागसता होती. चित्रपटांमधील रिलेशनशिपमधील हा सुवर्णकाळ होता. ही नाती सहज तयार झाली आणि आयुष्यभर टिकली” असं कॅप्शन यावेळी खेर यांनी दिल आहे.
View this post on Instagram
अनुपम खेर आणि दिवंगत स्टार अमरीश पुरी यांचा हा व्हिडिओ समोर आल्यापासून सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या पोस्टवर अनेकांनी खेर यांचे कौतुक केले आहे. एका युजरने लिहिले,सर तुम्ही स्वतःला नाव ठेऊन दुसऱ्यांना आनंद देत आहेत तुम्ही ग्रेट आहेत. तसेच अनेकांनी या जोडीचे कौतुक देखील केले आहे.