Anupam Kher New Film| बॉलीवूडचे सुप्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांनी आजपर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. विविध भूमिका साकारत त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. अभिनयासोबत त्यांनी दिग्दर्शन क्षेत्रातही काम केले आहे. ‘ओम जय जगदिश’ या चित्रपटाचं दिग्दर्शन त्यांनी केले होते. मात्र हा चित्रपट अयशस्वी ठरला. त्यानंतर त्यांनी दिग्दर्शन क्षेत्रात काम केले नाही. मात्र नुकतेच त्यांनी आपल्या वाढदिवसाच्या दिवशी नव्या चित्रपटाची घोषणा करत पुन्हा दिग्दर्शनाला सुरुवात करणार असल्याचे सांगितले.
अनुपम खेर यांनी नव्या चित्रपटाची घोषणा करत आईचे आशीर्वाद घेतले. या नव्या चित्रपटाचे दिग्दर्शन ते स्वत: करणार आहेत. याचा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ पोस्ट करताना अनुपम खेर यांनी लिहिलं, “माझ्या वाढदिवसाचे औचित्य साधत मला ज्या चित्रपटाचे दिग्दर्शन करायचे आहे त्याची मी आज घोषणा करत आहे. चित्रपटाचे नाव आहे ‘तन्वी द ग्रेट’.”
View this post on Instagram
पुढे त्यांनी लिहिले, “काही कथा या लोकांपर्यंत पोहोचल्याच पाहिजेत. माझ्या डोक्यात विचार आला की माझ्या आईच्या, देवाच्या आणि वडिलांच्या आशीर्वादानेच याची सुरुवात केली पाहिजे. या चित्रपटावर मी गेले तीन वर्ष काम करत आहे. अखेर उद्या महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर मी या चित्रपटाचं चित्रीकरण सुरु करत आहे. वाढदिवशी स्वतःला नवीन आव्हान देण्याची मजा काही वेगळीच आहे. तुम्हा सगळ्यांचे प्रेम आणि आशीर्वाद असेच पाठीशी असूद्यात.” Anupam Kher New Film|
दरम्यान, अनुपम खेर यांनी विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मिर फाइल्स’ या चित्रपटात झळकले होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. त्यानंतर अनुपम यांचा अमिताभ बच्चन आणि बोमन इराणीसोबत ‘ऊंचाई’ चित्रपटात दिसले होते. आता लवकरच ते नव्या चित्रपटात दिग्दर्शक म्हणून दिसणार आहेत. Anupam Kher New Film|