Kangana Ranaut : अभिनेत्री कंगणा राणावतचे एकामागून एक चित्रपट फ्लॉप होत आहेत. एकीकडे ती ‘इमर्जन्सी’ चित्रपटामध्ये व्यस्त असताना कंगणाने तिच्या आगामी चित्रपटाची माहिती चाहत्यांसोबत शेअर केली आहे. कंगना आता आर. माधवन सोबत चित्रपट करणार आहे. नुकतेच तिने सोशल मीडियावर आर. माधवन सोबतचा एक फोटो शेअर केला आहे.
कंगनाने तिच्या इन्स्टाग्रामवर स्टोरीवर आर माधवनसोबतचा तिचा सेल्फी शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘मी माझ्या आवडत्या आर माधवनसोबत आणखी एका उत्तम स्क्रिप्टसोबत परत येत आहे’. याशिवाय तिने आणखी एक फोटो शेअर केला असून त्यात ती काही लोकांसोबत बसलेली दिसत आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने ‘किती छान टीम आहे’, असे म्हटले. कंगना आणि आर माधवन यांनी यापूर्वी ‘तनू वेड्स मनू’ आणि त्याचा सिक्वेल ‘तनु वेड्स मनु रिटर्न्स’मध्ये एकत्र काम केले आहे.
कंगनाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती शेवटची ‘तेजस’मध्ये दिसली होती. मात्र, त्याचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. याशिवाय तिचा ‘धाकड’, ‘पंगा’ आणि ‘थलाईवी’ सारखे सर्व चित्रपट फ्लॉप ठरले आहेत. आता कंगना तिच्या आगामी ‘इमर्जन्सी’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात कंगना माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारत आहे. इतकंच नाही तर कंगना अभिनयासोबतच दिग्दर्शनही करत आहे. या चित्रपटात कंगनासोबतच श्रेयस तळपदे, अनुपम खेर, महिमा चौधरी हे कलाकारही दिसणार आहेत.