मुंबई – बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी-कुंद्रा घरी पुन्हा एकदा पाळणा हलला असून तिने 15 फेब्रुवारी 2020 रोजी एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. सोशल मीडियावरून खुद्द शिल्पानेच याची माहिती आपल्या चाहत्यांना, नातेवाईकांना आणि हितचिंतकांना दिली होती.
दरम्यान, आज पहिल्यांदा पती राज कुंद्रा, मुलगा विहान आणि मुलगी समीशाबरोबर ती मीडियासमोर आली. शिल्पा शेट्टी दुसऱ्यांदा आई झाली पण याची कोणाला काही दिवसांसाठी माहिती सुद्धा नव्हती. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. सरोगसीद्वारे अभिनेत्री शिल्पा शेट्टीने मुलीला जन्म दिला.
आज पहिल्यांदा मुलीला सर्वांसमोर आणल्यानंतर शिल्पा खूप आनंदी दिसत होती. मात्र अद्याप तिने तिच्या मुलीचा चेहरा तिच्या चाहत्यांना दाखवला नाही आहे.
शिल्पाने आपल्या मुलीचं नाव समीशा ठेवलं आहे. शिल्पाने समीशाचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत तिचं स्वागत केलं आहे. शिल्पाने अचानक आपल्या मुलीचा फोटो इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केल्याने चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. समीशाचं बोट पकडल्याचा फोटो शिल्पाने शेअर केला होता. त्यामुळे अद्याप समीशा कशी दिसते याची उत्सुकता तिच्या फॅन्सना आहे. चाहत्यांनीही कमेंट्स करत समीशाचं आनंदात स्वागत केलं आहे. 7 वर्षांनंतर शिल्पाने पुन्हा एकदा आई होण्याचा निर्णय घेतला आणि तिने समीशाला जन्म दिला.