खडकी – औंध बोपोडी येथील आयटी पार्क समोरील कार्यालयास सकाळी साडेनऊच्या सुमारास भीषण आग लागली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. औंध अग्निशमन केंद्राच्या जवानांनी 10 मिनिटात आग आटोक्यात आणली.
औंध अग्निशमन दलाचे अधिकारी कमलेश सनगळे, शिवाजी लोखंडे, संजय कारले, दादासाहेब यादव, संजय शेवाळे, श्रेयश तळपे यांनी ही कामगिरी बजाविली. दरम्यान, आगीचे कारण अद्याप कळू शकले नाही.