नवी दिल्ली : जपानचे पंतप्रधान फुमीयो किशिदो हे सध्या भारताच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते दोन्ही देशातील संबंध चांगले करण्यासाठी काही करार करणार आहेत. मात्र यातून वेळ काढून त्यांनी भारताच्या काही खास पदार्थांचा आस्वाद घेतलाय. याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
#WATCH | Prime Minister Narendra Modi and Japanese PM Fumio Kishida visit Buddha Jayanti Park in Delhi. The Japanese PM also tried Gol Gappe, Lassi and Aam Panna here.
(Source: DD News) pic.twitter.com/sC3khaR31v
— ANI (@ANI) March 20, 2023
ज्या पदार्थांचे नाव काढताच तुमच्या आमच्या तोंडाला पाणी सुटतं अशा पाणी पुरी, लस्सी आणि कैरीच्या पन्ह्याची चव फुमीयो किशिदो चाखलीय…त्यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या पदार्थांचा आस्वाद घेतला. या दोन्ही नेत्यांनी दिल्लीच्या बुद्ध जयंती पार्कमध्ये या पदार्थांचा आस्वाद घेतला.
My friend PM @kishida230 enjoyed Indian snacks including Golgappas. pic.twitter.com/rXtQQdD7Ki
— Narendra Modi (@narendramodi) March 20, 2023
सुरुवातीला पाणीपुरीच्या तिखट आणि आंबट पाणीपुरीविषयी किशिदो यांनी भीती व्यक्त करणारे एक ट्विट केले होते पण समोर आलेल्या व्हिडिओतून त्यांना पाणीपुरीचा काही त्रास झाल्याचे जाणवत नाही.
दरम्यान, यावेळी पंतप्रधान मोदींनी कुशीदो यांना कदंब वृक्षापासून तयार करण्यात आलेल्या जाळीदार बॉक्सची भेट दिली. या बॉक्समध्ये भगवान गौतम बुद्धांची चंदनापासून तयार करण्यात आलेली मूर्ती असल्याचं सांगण्यात येत आहे.