#व्हिडीओ : ओतूरमध्ये मुस्लिम बांधवाच्या घरी घटस्थापना

महिलांचा उपवास ; तिनशे वर्षापासूनची परंपरा
ओतूर (प्रतिनिधी) : ओतूर परिसरात मुस्लिम बांधवाच्या घरी घटस्थापना केली असून दररोज अतिशय भक्तिभावाने विधीवत पुजा, आरती करण्यात येते. तसेच घरामधील महिलेने देखील नऊ दिवस नवरात्राचे उपवास धरलेले आहेत. नऊ दिवस अतिशय भक्तिमय वातावरण घरात असल्याचे या कुटुंबाने सांगितले.

ओतूर परिसरात राहणारे एक मुस्लिम कुटुंब परंपरागत नवरात्रोत्सव साजरा करित आहे. ही परंपरा त्यांची सुमारे तिनशे वर्षापासून असल्याचे ते सांगतात. या कुटुंबात तिनशे वर्षापासून काळूबाई देवीची आखिव रेखीव संगमरवराची मुर्ती आहे. या मुर्तीची अतिशय भक्तिभावाने वर्षभर पुजा केली जाते. नवरात्रोत्सव काळात तर घटस्थापना करुन घरातील महीला कडक उपवास देखील करतात. येथे केलेली घटस्थापना पाहण्यासाठी व देवीचे दर्शन घेण्यासाठी परिसरातून भावीक भक्त जमा होत असतात.

हिंदु धर्म शास्त्राप्रमाणे शारदीय नवरात्रोत्सव साजरा केला जात असल्याचे येथे निदर्शनास येते. तर या कुटुंबातील सदस्य जात, धर्म पाळत नाहीत मानत नाहीत सर्वधर्म समभाव व समानतेचा संदेश या कुटुंबातून दिला जातोय. या कुटुंबातील व्यक्ती हजला जाऊन आल्याने मुस्लिम समाजात देखील त्यांच्या कुटुंबाला मानसन्मान दिला जातो. मात्र काही सामाजिक बंधन असल्याने हे कुटुंब जाहीरपणे हिंदु परंपरागत साजरे करित असणारे उत्सव जाहीर करीत नसल्याची खंत देखील त्यांना आहे. तर नवरात्रोत्सव देखील साजरा करित असल्याचे वृत्त प्रसिद्ध करण्यास व नाव प्रसिद्ध होण्यास त्यांनी ईन्कार केला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here