#Aarey Forest : पर्यावरणप्रेमींवर उद्या गुन्हा दाखल होऊ शकतो – अखिलेश यादव

मुंबई – ठाण्यातील आरे वृक्षतोडप्रकरणावर सर्वस्तरातून टीका होत आहे. यामध्ये बॉलीवूडमधील कलाकार आणि राजकीय नेत्यांनीही आरेच्या वृक्षतोडीवर संताप व्यक्त केला आहे. आरेतील झाडे वाचवण्यासाठी आंदोलन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यानंतर आता या प्रकरणावर उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी ट्विट करून प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

अखिलेश यादव यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की “भाजपला पर्यावरणवाद्यांचीही आता भीती वाटत आहे. आज झाड वाचवणे गुन्हा ठरत आहे, तर उद्या या पर्यावरणवाद्यांवर देशद्रोहाचा आरोपही लागू शकतो. आंतरराष्ट्रीय मंचावर एकीकडे पर्यावरण वाचवण्याच्या गोष्टी सुरु आहेत, तर दुसरीकडे देशातील जंगले नष्ट होत आहेत. गांधीजींनी म्हटले होते की, जंगलांबाबतच्या कृतीतून माणसाची मानसिकता दिसून येते.” या पर्यावरणवाद्यांवर उद्या देशद्रोहाचाही गुन्हा दाखल होईल, अशा शब्दांत त्यांनी भाजपवर टीका केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.