करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरात तोफेच्या सलामीने घटस्थापना

कोल्हापूर  – साडेतीन शक्तिपीठांपैकी एक महत्वाचं पीठ असणाऱ्या करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या इतिहासात पहिल्यांदाच शनिवारी भाविकांविना शारदीय नवरात्रौत्सवाला प्रारंभ झाला.

घटस्थापनेनिमित्त देवीची श्री करवीरमाहात्म्यातील वर्णनानुसार महाशक्ती कुंडलिनीस्वरूपामध्ये पूजा बांधण्यात आली. करोनामुळे अंबाबाई मंदिर बंद असले तरी भाविकांनी बाहेरून कळसाला नमस्कार करून देवीपुढे हात जोडले.

करोनामुळे अजूनही राज्यातील मंदिरे भाविकांसाठी बंद आहेत. नवरात्रौत्सवात मंदिरांमध्ये होणारी गर्दी लक्षात घेऊन ती उघडलेली नाहीत. त्यामुळे दरवर्षी लाखोंच्या भाविक संख्येचा आकडा पार करणाऱ्या कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात शनिवारी शांतता होती.

पहाटेच्या काकडआरतीनंतर देवीचा सकाळीचा अभिषेक झाला. त्यानंतर तोफेच्या सलामीने घटस्थापना झाली. मंदिराचे व्यवस्थापक धनाजी जाधव यांच्या हस्ते शासकीय अभिषेक झाला. दुपारच्या आरतीनंतर देवीची सालंकृत पूजा बांधण्यात आली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.