नवी दिल्ली : आपल्या अतरंगी फॅशनमुळे अभिनेत्री उर्फी जावेद ही नेहमीच चर्चेत येत असते. रोज तिचा नवा आणि अजब-गजब फॅशन लूक लोकांना पाहायला मिळतो. मात्र सध्या सोशलमिडीयावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून हे पाहून नेटकऱ्यांनी चक्क डोक्याला हात मारून घेतला आहे.
उर्फी सार्वजनिक ठिकाणी असे विचित्र कपडे परिधान करते यामुळे अनेकांचा तिला विरोध देखील असतो. मात्र आता उर्फी ही काही लोकांसाठी फॅशन आयकॉन बनल्याचे एक उदाहरण सध्या समोर येत आहे. दिल्ली मेट्रो गेल्या अनेक दिवसांपासून ट्विटरवर खूप ट्रेंड करत आहे. मेट्रोमध्ये एका मुलीचा व्हिडिओ आणि फोटो खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती बिकिनी परिधान करून मेट्रोमध्ये प्रवास करताना दिसत आहे. बघता बघता हा व्हिडिओ इतका व्हायरल झाला की तो चर्चेचा विषय बनला. नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर प्रतिक्रियाही दिल्या आहेत.
हे व्हिडिओ शेअर करताना एका यूजरने उर्फी जावेदच्या व्हायरसपासून सावध राहा, असं लिहिले आहे. बर्याच लोकांनी उर्फी आणि या मुलीचा कोलाज बनवत ट्रोल देखील केले आहे जे व्हायरल होत आहे. तर आणखी एका यूजरने लिहिले की, हा एक खतरनाक व्हायरस आहे जो दिल्लीकडे सरकत आहे.
What is wrong with #delhimetro
🙈 #Girls How can you travel like this in #delhimetro 😰#DelhiMetroDiaries #delhi #womenempowement #womensafety #delhipolice #CISF #feminism #feminist #feminists
●Lets see if @OfficialDMRC @DelhiPolice have the guts to ans these ques? pic.twitter.com/IsAabGPJi7— YoursJaskier (@JaskierYours) April 2, 2023
ही बिकिनी घातलेली ही मुलगी ट्विटरवर इतकी व्हायरल झाली की, ही मुलगी कोण आहे हे जाणून घ्यायचं होत. तर ही व्हायरल मुलगी ऋदम चन्ना आहे. ती पंजाबची रहिवासी आहे. ऋदम ही एकमेव मुलगी आहे जी बिकिनी घालून दिल्ली मेट्रोमध्ये प्रवास करताना दिसली होती.
जेव्हा ऋदमला याविषयी विचारण्यात आलं तेव्हा तिने, ती प्रसिद्ध होण्यासाठी असे कपडे घालत नाही. तसेच तिला प्रसिद्धीची भूकही नाही. ती जे करायचं असतं ती तेच करते. गेल्या अनेक दिवसांपासून ती असाच प्रवास करत आहे. त्याचवेळी ती उर्फी जावेदकडून प्रेरित झाली आहे का सवालही तिला विचारण्यात आला त्यावेळी तिने ती उर्फीला ओळखत नसल्याचे सांगितले आहे. रिदम चन्नाने सांगितले की, तिच्या कुटुंबाला तिच्या पेहराव आणि विचार अजिबात आवडत नाहीत. त्यामुळेच तिचं स्वतःच्या कुटुंबासोबत जमत नाही. तिचे शेजारी तिच्या कुटुंबाला धमकावतात पण तिला त्याची पर्वा नाही.