मुंबई – अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांचा ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट सुपरहिट ठरला. सुरवातीला या चित्रपटावर प्रचंड टीका करण्यात आली होती. मात्र तरी देखील या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. या चित्रपटाच्या यशानंतर आता चित्रपटाच्या पुढील भागाची अनेक जण आतुरतेने वाट पाहत आहे. यातच आता दिग्दर्शक अयान मुखर्जी याने ‘ब्रह्मास्त्र २ -३ ’ बाबत माहिती दिली आहे.
अयानने मंगळवारी सकाळी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. त्याने पोस्टमध्ये लिहिले की, “ब्रह्मास्त्र २ आणि ब्रह्मास्त्र ३ हे चित्रपट पहिल्या भागपेक्षा भव्य असतील. याच बरोबर या दोन्ही चित्रपटांवर मी एकत्रच काम करणार आहे. कारण हे दोन चित्रपट मी एका पाठोपाठ एक प्रदर्शित करणार आहे. त्यानुसार ‘ब्रह्मास्त्र २’ हा चित्रपट डिसेंबर २०२६ साली प्रदर्शित होणार आहे, तर ‘ब्रम्हास्त्र ३’ हा चित्रपट एका वर्षाने म्हणजेच डिसेंबर २०२७ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.”
View this post on Instagram
दिग्दर्शकाच्या या पोस्टवर अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे. तसेच आता लवकरच प्रेक्षकांना ब्रह्मास्त्र २ -३ पाहता येणार आहे. दरम्यान, ‘ब्रह्मास्त्र’ प्रमाणे त्याच्या पुढील भागाला देखील प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळणार का? हे पाहावे लागणार आहे. ‘ब्रह्मास्त्र’ हा कोरोनानंतरचा सर्वाधिक कमाई करणारा सुपरहिट चित्रपट ठरला होता.