मुंबई – अभिनेता सलमान खानचा ‘किसी का भाई किसी कि जान’ हा चित्रपट प्रदर्शित झालेला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा समिश्र असा प्रतिसाद मिळताना दिसतोय. त्यासोबतच भाईजानच्या आगामी ‘टायगर 3’ चित्रपटाच्या सेटवरून एक व्हिडिओ लीक झाला आहे, ज्यामध्ये भाईजान अर्थात सलमान खान स्वतः स्मोकिंग करताना दिसत आहे.
‘टायगर 3’ च्या सेटवरील लीक झालेला व्हिडिओ इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होत आहे. या क्लिपमध्ये सलमान काळ्या रंगाचा शर्ट घालून टीमसोबत बसलेला दिसत आहे. दरम्यान, तो बोलत असताना धूम्रपान करत असल्याचे देखील पाहायला मिळत आहे. यावर आता नेटकऱ्यांनी देखील कॉमेंटबाजी सुरु केली आहे.
हा व्हिडीओ ‘टायगर 3’ चित्रपटाशी संबंधित असल्याचं सोशल मीडियावरील अनेकांचं म्हणणं आहे. मात्र याबाबतची कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. व्हिडिओमधील भाईजानचा ब्लॅक पठाणी अवतार प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. ‘टायगर 3’ हा YRF चा ऍक्शन थ्रिलर चित्रपट आहे. 2012 मध्ये रिलीज झालेल्या ‘एक था टायगर’चा हा तिसरा भाग आहे. या चित्रपटात सलमान, इमरान हाश्मी आणि कतरिना कैफ मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
#SalmanKhan In Black Pathani With Ciggrate On The Sets Of #Tiger3 , Eid Mubarak🌛 pic.twitter.com/aw58zJ8B2I
— Radhe (@BadassSalmaniac) April 22, 2023
‘टायगर 3’मध्ये शाहरुख खानही कॅमिओ करणार असल्याच्या चर्चा आहेत. या चित्रपटाच्या टीझरने प्रेक्षकांची उत्सुकता आधीच उंचावली आहे. त्याच वेळी, 2023 च्या दिवाळीच्या मुहूर्तावर तो हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.