Katrina Kaif : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (World Cup 2023 Final) यांच्यात वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील अंतिम सामना सुरु आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी स्वीकारली. भारताने प्रथम फलंदाजी करताना हव्या तितक्या धावा केल्या नाहीत.
भारताने 50 षटकात सर्वबाद 240 धावा केल्या. यामुळे भारतीय क्रीडाप्रेमींची धाकधूक वाढली आहे. संपूर्ण स्पर्धेत टीम इंडियाने चांगली कामगिरी आणि अंतिम सामन्यातील अशी खेळी पाहून क्रीडाप्रेमींचं टेन्शन वाढलं आहे.
मात्र, बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) हिनं देखील मॅचच्या काही तास आधी विराट कोहलीचं (Virat Kohli) कौतुक केलं आहे. इतकंच नाही तर कतरिनानं आणखी एक गुपितही सांगितलं आहे. कतरिना कैफ हिनं सोशल मीडियावर चाहत्यांशी संवाद साधला.
तिनं चाहत्यांसाठी प्रश्न आणि उत्तरं असं हे सेशन ठेवलं होतं. या सेशनमध्ये तिनं चाहत्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. एका चाहत्यानं तिला विराट कोहलीबद्दल विचारलं. यावर कतरिनानं दिलेलं उत्तर सध्या चर्चेत आलं आहे.
कतरिनानं इन्स्टास्टोरीवर विराटचा एक फोटो शेअर केला. विराटचा फोटो शेअर करत तिनं लिहिलं की, “तो एक सुपरस्टार आहे, प्रेरणादायक आहे. इतकंच नाही तर आणखी एक खास गोष्ट म्हणजे तो आमचा सगळ्यात चांगला शेजारी आहे, असं कतरिनानं म्हटलं आहे.
भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात सर्वबाद 240 धावा केल्या आणि विजयासाठी 241 धावांचं आव्हान दिलं आहे. आता हे आव्हान रोखण्यासाठी भारतीय गोलंदाजाची कठीण परीक्षा असणार आहे. मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा यांच्यावर जबाबदारी असणार आहे.