Bollywood : अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि अभिनेता सलमान खानचा (Salman Khan) ‘टायगर 3’ (Tiger 3) हा प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातील कतरिनाच्या अॅक्शन सीनला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली आहे. मात्र या सिनेमातील एका सीनची चांगलीच चर्चा रंगली आहे. यात कतरिनाचा टॉवेल सीन दाखवण्यात आला आहे. यावर कतरिनाचा पती अभिनेता विकी कौशलने (Vicky Kaushal) प्रतिक्रिया दिली आहे.
विकी म्हणाला, “मी चित्रपटाच्या स्क्रिनिंगला गेलो होतो आणि आम्ही चित्रपट पाहत होतो. साहजिकच जेव्हा हा सीन आला तेव्हा मी तिच्याकडे झुकलो आणि म्हणालो, ‘मला तुझ्याशी वाद घालायचा नाही. मला नाही वाटत की तू मला टॉवेल घालून असे मारावे. तिने ज्या पद्धतीने हे केले ते आश्चर्यकारक आहे असे मला वाटले. मी तिला सांगितलं तू बॉलिवूडची सर्वात उत्तम अॅक्शन अभिनेत्री आहे. मला कतरिनाच्या मेहनतीवर गर्व आहे. तिला पाहाणं कायम माझ्यासाठी प्रेरणादायक असते.’
विकी आणि कतरिना नेहमीच एकमेकांचं कौतुक करताना दिसतात. त्यामुळे ही जोडी अनेकांच्या पसंतीस पडते. दरम्यान, कतरिनाच्या टायगर 3 नंतर विकीचा पुढचा चित्रपट सॅम बहादूर देखील रिलीजसाठी सज्ज आहे. सिनेमात अभिनेत्याने फिल्ड मार्शल सॅम मानेकशॉ यांची भूमिका बजावली आहे. मेघना गुलजार यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा चित्रपट येत्या शुक्रवारी 1 डिसेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रणबीर कपूर स्टारर संदीप रेड्डी वंगा यांच्या अॅनिमलशी टक्कर देणार आहे.