Tiger 3 : सलमान खान, कतरिना कैफ आणि इमरान हाश्मी यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘टायगर 3’ हा सिनेमा 12 नोव्हेंबर रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला, ज्याने केवळ देशातीलच नव्हे तर जगभरातील चाहत्यांचे प्रेम जिंकले.
मात्र, असे काही चाहते होते जे काही कारणास्तव थिएटरमध्ये चित्रपट पाहू शकले नाहीत. पण आता सलमान खानने त्या चाहत्यांना गिफ्ट देत टायगर 3 च्या ओटीटी रिलीजची घोषणा केली आहे. इतकंच नाही तर ही आनंदाची बातमी त्याने आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केली आहे.
View this post on Instagram
‘Amazon Prime Video’वर टायगर 3 च्या आगमनाची घोषणा करताना सलमान खानने लिहिले, “लॉक्ड, लोडेड आणि रेडी. टायगर येत आहे. पहा टायगर 3 आता प्राइम व्हिडिओवर’. ही बातमी शेअर होताच चाहत्यांनी हार्ट आणि फायर इमोजींनी भरभरून कमेंट केल्या आहेत.
दरम्यान, सिनेमाच्या कलेक्शनबद्दल बोलायचे तर ‘टायगर 3’ने भारतात 300 कोटींहून अधिक कमाई केली होती. तर जगभरात हा आकडा 450 कोटींच्या पुढे गेला आहे.
सर्वांना माहित आहे की, टायगर 3 हा YRF स्पाय युनिव्हर्सचा पाचवा चित्रपट आहे, टायगर 3, जो 2017 मध्ये प्रदर्शित झालेल्या टायगर जिंदा हैचा फॉलोअप सिनेमा आहे.
टायगर 3 नंतर रणबीर कपूरच्या अॅनिमल, विकी कौशलच्या सॅम बहादूर, शाहरुख खानच्या डिंकी आणि प्रभासच्या सालारची थिएटरमध्ये क्रेझ निर्माण झाली आहे. या चित्रपटाने देखील बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे.