नवी दिल्ली : माणूस संपत्ती मिळवण्यासाठी कोणत्या थराला जाईल हे सांगता येत नाही. कारण सख्ख्या भावा-बहिणीमध्ये मुलगा-वडिलांमध्ये याच संपत्तीमुळे वैर निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, याच संपत्तीपाई एका वकिलाने आपल्या सगळ्या मर्यादा ओलांडून माणुसकीला काळिमा फासला आहे. त्याने केलेल्या कृत्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी या घटनेवर राग व्यक्त केला आहे.
सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एका वृद्ध महिलेचा मृतदेह कारमध्ये पडलेला दिसत आहे. संतापजनक म्हणजे या वेळी एक वकील या मृतदेहाच्या अंगठ्याचे ठसे काही कागदांवर उमटवताना दिसत आहे, तर त्याच्या मागे दोन माणसंही उभे असल्याचेही दिसत आहे.
नीचता की पराकाष्ठा देखिये
वीडियो आगरा के सेवला जाट का बताया जा रहा है
जिसमें एक मृतक वृद्धा से उनकी सम्पतियाँ लेने के लिए उनके शव से अंगूठा लगवाया जा रहा है
इन अमानवीय लोगों का सामाजिक बहिष्कार होना चाहिए@myogiadityanathजी@Uppolice @dgpup@agrapolice @adgzoneagra संज्ञान लीजिये pic.twitter.com/r87ZXWSAwC— Roli Tiwari Mishra सनातनी डॉ रोली तिवारी मिश्रा (@RoliTiwariMish1) April 10, 2023
हा व्हिडिओ आग्रा येथील असल्याचे सांगितले जात असून तो माजी सपा नेत्या रोली मिश्रा तिवारी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले आहे की, “किळसवाणा प्रकार पाहा, हा व्हिडिओ आग्रा येथील असल्याचं सांगितलं जात आहे, ज्यामध्ये मृत वृद्ध महिलेची मालमत्ता घेण्यासाठी तिच्या मृतदेहाच्या अंगठ्याचे ठसे घेतले जात आहेत. अशा अमानुष लोकांवर सामाजिक बहिष्कार टाकला पाहिजे.” शिवाय त्यांनी हे ट्वीट यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, यूपी पोलीस आणि आग्रा पोलिसांना टॅग केले आहे.
या व्हिडीओवर आता नेटकऱ्यांकडून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, लज्जास्पद… लोकांची मानसिकता किती खालच्या पातळीवर जाऊ शकते, हेच व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. तर आणखी एकाने, असले घृणास्पद कृत्य करताना लाज कशी वाटत नाही? हे कोणत्या प्रकारचे लोक आहेत असं लिहिलं आहे. दुसऱ्या एका नेटकऱ्याने, “हे कृत्य अत्यंत अमानवी असून, मालमत्तेसाठी आणि जमिनीसाठी लोक कोणत्याही टोकाला जाऊ शकतात, त्यांना वृद्धांची कसलीही काळजी वाटत नाही.”दरम्यान, या वकिलासह त्या वृद्ध महिलेच्या कुटुंबियांना देखील अटक करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे. तर पोलीस प्रशासन यावर काय कारवाई करते हे पाहणे गरजेचे आहे.