व्हिडीओ : दुबेची मुजोरी पोलिसाने फटक्यात जिरवली!

उज्जैन – संपूर्ण देशाला हादरवून सोडलेल्या विकास दुबेला अखेर आज अटक करण्यात आली. धाड टाकण्यासाठी आलेल्या पोलिसांवर बेछूट गोळीबार करत आठ पोलिसांना जागीच ठार तर अन्य ७ जणांना गंभीर जखमी केल्याचा आरोप दुबेवर आहे.

या हल्ल्यानंतर तो उत्तर प्रदेशातील कानपुर येथून फरारी झाला होता. गेली पाच दिवस पोलीस त्याच्या मागावर होते मात्र अखेर आज त्याला कानपूरपासून  ७०० किलोमीटर अंतरावर वसलेल्या उज्जैन येथील महाकाल मंदिर परिसरात अटक करण्यात आले.

दरम्यान दुबेच्या अटकेचे वृत्त आल्यानंतर, आठ पोलिसांनाच खून केल्यानंतर दुबे उज्जैनपर्यंत पोहोचलाच कसा?  दुबेला अटक करण्यात आली आहे की त्याने आत्मसमर्पण केले आहे? असे प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत. अशातच आता पोलीस दुबेला ताब्यात घेत असतानाच एक व्हिडीओ समोर आला असून यामध्ये दुबे पोलिसांसमोर चढ्या आवाजात बोलताना दिसतोय.

आठ पोलिसांच्या खुनानंतर दुबे ७०० किलोमीटर दूर असलेल्या उज्जैनला पोहचतोच कसा?

सदर व्हिडिओमध्ये दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी कुख्यात गुन्हेगार दुबे याला पकडल्याचे दिसत असून तो त्यांना उद्देशून, ‘मी दुबे आहे. कानपुरवाला दुबे’ असे चढ्या आवाजात ओरडून सांगत आहे. दुबेने आवाज चढवल्यानंतर त्याला मागून पकडलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने त्याच्या डोक्यावर जोरात चापट मारल्याचं दृश्य दिसतंय. पोलीस कर्मचाऱ्याच्या हातची चापट खाल्यानंतर मात्र दुबे गपगार पडल्याचंही सदर चित्रफितीमध्ये दिसत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.