संजय राऊतांनी घेतलेल्या मुलाखतीत पवारांचे मोठे विधान

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवेल अशी मुलाखत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांची घेतली. ही मुलाखत  ११, १२ आणि १३ जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून संजय राऊत पवारांची पहिलीच मुलाखत घेत आहेत. या मुलाखतीमधून सर्व गारद होतील, असे देखील संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, आज या मुलाखतीचा दुसरा टिझर प्रसिद्ध करण्यात आला. यामध्ये शरद पवारांनी मोठे विधान केले आहे. राऊतांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना “बाळासाहेबांची कार्यशैली भाजपच्या कामाशी सुसंगत होती,असं मला कधीच वाटलं नाही” असं शरद पवारांनी म्हटले आहे. त्यामुळे पूर्ण मुलाखत प्रसिद्ध झाल्यानंतर सर्व गारद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आज टिझर प्रसिद्ध करताना ‘ठाकरे सरकारचे आपण रिमोट कंट्रोल आहात की हेडमास्तर? काय म्हणतात शरद पवार?, असे कॅप्शन दिले आहे. महाविकास आघाडी स्थापन करून भाजप मधील दिग्गजांचा घुमजाव केला. भाजपकडे मोठा आकडा असताना सुद्धा त्यांना सत्तेपासून दूर ठेवले. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील चाणक्य म्हणून त्यांची राजकीय वर्तुळात चर्चा होती.

मुलाखतीबाबत संजय राऊत म्हणाले, देशाचे नेते शरद पवार यांच्याशी दिलखुलास गप्पा झाल्या. ही जोरदार राजकीय मुलाखत देशाच्या राजकारणात खळबळ माजवेल. लवकरच  वृत्त वाहिन्यांवर पहाता येईल. शरद पवार चीन पासून महाराष्ट्रातील घडामोडी पर्यंत जोरदार बोलले.

Leave A Reply

Your email address will not be published.